अलिबाग,रायगड : मुबंई पुणे हायवेवर बोरघाटात एशियाड बस ला अपघात, १२ प्रवासी जखमी

435
           अलिबाग,रायगड : काल मंगळवार दि. २० ला संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास मुंबई – पुणे हायवेवर बोरघाटात एक एशियाड बस पलटी होऊन अपघात झाला.
           या अपघातात  १२ प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळाली असून घटनास्थळी आय आर बी कर्मचारी, खोपोली पोलीस, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी  देवदुता सारखी धावली.  त्यामुळे सर्व प्रवासी वाचले आहेत. या अपघातातील सर्व १२  जखमींना तातडीने खोपोली नगरपालीका रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
– प्रतिनिधी,सारिका पाटील,(सा.समाजशील,अलिबाग)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *