अलिबाग,रायगड : पोयनाड विभागात शेकापला हादरा, शिवसेना नेते महेंद्र दळवी, तालुका प्रमुख राजा केणी यांच्यावर विश्वास ठेवून शेकापच्या विद्यमान उपसरपंच, माजी सरपंचासह असंख्य कार्यकर्ते व महिलांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

582
           अलिबाग,रायगड : शिवसेना पक्षावर विश्वास ठेवून तालुक्यातील श्रीगाव ग्रामपंचायती मधील शेकापचे विद्यमान उपसरपंच विकास हाशा निळकर, माजी सरपंच माधव मधुकर पाटील यांच्यासह प्रमुख असंख्य कार्यकर्त्यांनी व महिलांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
         यावेळी शिवसेना जेष्ठ नेते विजय कवळे, माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, तालुकाप्रमुख राजा केणी, माजी तालुकाप्रमुख दीपक रानवडे, नरेश म्हात्रे, उपतालुका प्रमुख प्रकाश पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला.
        शेकापच्या एकधिकारशाहीला कंटाळून शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन शेकापच्या विद्यमान उपसरपंच, माजी सरपंच, प्रमुख कार्यकर्ते व महिलावर्गाने शिवसेनेत प्रवेश केला. राजा केणी यांनी तालुकाप्रमुख पद स्वीकारल्यानंतर शेकापला खिंडार लावण्याचे काम सुरू केले आहे. शिवसेना पक्षाला तालुक्यात उभारी देण्यासाठी केणी हे सक्रिय झाले असून खारेपाट विभागातील शेकापचे प्राबल्य कमी करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. 
         अलिबाग तालुक्यात डिसेंबरमध्ये अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्या दृष्टीने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक कामाला लागले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत खारेपाट विभागातून अनंत गीतेंना मोठ्या प्रमाणात मताधिक्य देण्यासाठी शिवसैनिकांनी विडा उचलला आहे. माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी यांच्या सुमन क्रियेशन येथे आज शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला होणार असल्याचे राजा केणी यांनी सा.समाजशीलशी बोलताना सांगितले.
– प्रतिनिधी,सारिका पाटील,(सा.समाजशील,अलिबाग)  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *