पराग ऍग्रो फूड्स अँड अलाईड प्रॉडक्टस प्रा. लि. रावडेवाडी कारखान्याचा गाळप हंगाम सुरु – हंगामात ८ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट 

922
पराग ऍग्रो फूड्स अँड अलाईड प्रॉडक्टस प्रा. लि. रावडेवाडी कारखान्याचा गाळप हंगाम सुरु – हंगामात ८ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट   
           शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील रावडेवाडी येथे असणारा व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या पराग ऍग्रो फूड्स अँड अलाईड प्रॉडक्टस प्रा. लि. कारखान्याचा २०२१ – २०२२ चा गाळप हंगाम मिल रोलर पुजन करून सुरु झाल्याची माहिती कारखान्याचे शेतकी अधिकारी अंकुश आढाव यांनी स.समाजशीलशी बोलताना दिली.
            पराग साखर कारखान्याचा गाळप हंगाम सन २०२१-२०२२ सिझनचे मिल रोलर पुजन दि. महाराष्ट्र को. ऑप. बैंक मुंबईचे  बँक स्थायी तपासणीस अधिकारी बांते साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. कारखान्याने आगामी ऊस गाळप हंगामाची तयारी मिल रोलरचे पुजन करून सुरुवात केली आहे. गाळप हंगाम २०२१-२०२२ मध्ये ८ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. व त्यादृष्टीने कारखान्याने ऊसतोडणी,वाहतूक यंत्रणेचे नियोजन केले असल्याची माहिती ही आढाव यांनी दिली. मिल रोलर पुजन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणात कोरोनाचे नियम पळत करण्यात आले. कार्यक्रमाच्या निमित्ताने कारखान्याचे सर्व पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *