रामविजय फाऊंडेशनच्या माध्यमातून टाकळी हाजी-कवठे येमाई जिल्हा परिषद गटात सवलतीच्या दरात पिठगिरण्यांचे वाटप

1058
रामविजय फाऊंडेशनच्या माध्यमातून टाकळी हाजी-कवठे येमाई जिल्हा परिषद गटात सवलतीच्या दरात पिठगिरण्यांचे वाटप – माजी पंचायत समिती सदस्या डॉ.कल्पनाताई पोकळे यांची संकल्पना 
 शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – रामविजय फाऊंडेशन यांचे माध्यमातून टाकळी हाजी-कवठे येमाई जिल्हा परिषद गटात पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी पंचायत समिती सदस्य डॉ.कल्पनाताई पोकळे यांचे संकल्पनेतून रामविजय फाऊंडेशन यांच्या माध्यमातून गटातील गरीब व गरजू कुटूंबांना ५० टक्के सवलत दरात सुमारे १३५ पिठ गिरण्यांचे कोरोनाच्या प्रशासकीय नियमांचे पालन करून कवठे येथील माहेश्वरी मंगल कार्यालयात वाटप करण्यात आले.
कवठे येमाई, संविदणे व नजीकच्या वाड्यावस्त्यांवरील कुटूंबाना पायपीट करत दळण दळून घेण्यासाठी दूरवर जावे लागत असल्याने याआधी देखील रामविजय फाऊंडेशन यांचे माध्यमातून सुमारे २०० पिठगिरण्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे यांनी दिली.तसेच येणाऱ्या काळातही जिल्हा परिषद गटातील अनेक गरजू व निराधार कुटूंबांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत केली जाईल असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी मा.पंचायत समिती सदस्या डॉ.कल्पनाताई पोकळे, सामाजिक कार्यकर्ते रामदास सांडभोर, उपसरपंच निखिल घोडे, रितेश शहा, ग्रा.पं.सदस्य पांडुरंग भोर, राजेंद्र इचके, विठ्ठल मुंजाळ,किसन हिलाळ, डॉ.कुंडलिक शितोळे, भाऊसाहेब घोडे, मुकूंद नरवडे,लहू वागदरे, रोहिदास हिलाळ,अमोल पोकळे, बाबु खाडे, विठ्ठल घोडे, डॉ.हेमंत पवार, विक्रम इचके, मोहन पडवळ,भाऊसाहेब कांदळकर, सुनिल नरवडे, संतोष पोकळे, सोमनाथ भाईक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन रामविजय फाउंडेशन व डॉ.सुभाष पोकळे मित्रमंडळ यांच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती युवासेना तालुका प्रमुख नितीनकुमार नरवडे यांनी दिली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *