तळेगाव ढमढेरे येथील सावतामाळी कार्यालयात ओबीसी ची सर्वपक्षिय बैठक संपन्न

419
शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : ओबीसी समाजाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण काढून घेण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाला जागे करण्यासाठी “ओबीसी जागा हो” हे ब्रीदवाक्य घेऊन काल तळेगाव ढमढेरे या ठिकाणी ओबीसी शिरूर तालुका सर्वपक्षीय ओबीसी, ‌व्हिजेएनटी
समाजाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक मुद्दे मांडण्यात आले. ओबीसी समाजाला आरक्षण कसे मिळालं, ओबीसी समाजाची आजची परिस्थिती काय, भविष्यातील वाटचाल करत असताना ओबीसी समाजाला आरक्षणाची गरज नक्की का यावरही‌‌‌ ‌अनेक मान्यवरांनी‌ ‌मार्गदर्शन केले. मिळेल त्या मार्गाने पुन्हा एकदा आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न करू अशी प्रतिज्ञा याठिकाणी करण्यात आली. आज राजकीय आरक्षण जात असेल तर उद्या शैक्षणिक आरक्षणही जाऊ शकते तसेच भविष्यात याचा अनेक पालकांना, विद्यार्थ्यांना नुकसान होईल.  त्याचा तोटा लक्षात घेऊन “ऊठ ओबीसी जागा हो” या मथळ्याखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीचे आयोजन ‌पुणे जिल्हा जनता दल‌‌ अशोकराव भुजबळ तसेच ओबीसी काँग्रेस‌‌‌ शिरूर अध्यक्ष सचिन नरके, ओबीसी काँग्रेस सरचिटणीस शिरूर तालुका स्वप्निल शेलार, श्रीकांत नरके यांनी केले.
या बैठकीसाठी प्रामुख्याने शिरूर-हवेलीचे माजी आमदार पोपटराव गावडे, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे ‌सदस्य शिवाजीराव भुजबळ, ‌‌पश्चिम महाराष्ट्र समता परिषद अध्यक्ष सोमनाथ भुजबळ, राष्ट्रीय समाज पक्षाचे शिरूर तालुका अध्यक्ष शिवाजीराव कुराडे, रामकृष्ण बिडगर, मेंढपाळ संघटना अध्यक्ष काळूराम ठोंबरे, सावता परिषद अध्यक्ष गोरक्ष भुजबळ,  शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब नरके, पश्चिम महाराष्ट्र बसपाच्या अध्यक्ष सोमनाथ बापू कुदळे, मार्केट कमिटीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ, तळेगाव ग्रामपंचायत माजी सदस्य महेश राव भुजबळ, मनसेचे शिरूर तालुका कैलास नरके, तळेगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य ऍड सुरेश भुजबळ, नवनाथ भुजबळ, नामदेव खेडकर, ज्ञानेश्वर ठोंबरे, सुनील शिंदे, दत्तात्रेय भुजबळ, लक्ष्मण नरके, संजय धायरकर तलाठी संघटनेचे अध्यक्ष कैलास नरके, संतोष नरके, रवींद्र यादव, उमेश दरवडे, राजेश भुजबळ गणेश भुजबळ, संजय जकाते, संकेत नरके, अमित ढसाळ, अमोल भुजबळ, मयूर तुकाराम भुजबळ, संभाजी भुजबळ, चंद्रशेखर दरवडे, संजय गायकवाड उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *