१५ एकर गायरान जागेत दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील ४५० देशी झाडांचे वृक्षारोपण ; शिरूर हवेली मित्र परिवार” या व्हाट्सऍप ग्रुप चा उपक्रम

676
शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : सध्याच्या युगात प्रत्येकजण व्हाट्सएपवर आलाय आणि प्रत्येकाचा व्हॉट्सएप ग्रुप बनलाय. या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते. पण पुणे मधील शिरूर तालुक्यातील “शिरूर हवेली मित्र परिवार” या व्हाट्सऍप ग्रुप ने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत या मित्र परिवाराने रांजणगाव सांडस या ठिकाणी गेल्या वर्षी ४५० देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यापैकी 98 % झाडांचे संवर्धन करण्यात आले आहे व आज देखील ४०० देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. या सर्व झाडांची सवर्धन करण्याची जबाबदारी राहुल रणदिवे व पै. उमेश रणदिवे यांनी घेतली आहे. व्हाट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या सर्वपक्षीय तरुणांनी एकत्र येऊन हा सामाजिक उपक्रम राबविल्याने त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
रांजणगाव सांडस येथे १५ एकर गायरान असून, दरवर्षी प्रमाणे या वर्षीही या ग्रुपच्या सदस्यांनी ४५० झाडे लावली आहेत. आत्तापर्यंत जवळपास दहा हजार झाडे लावण्यात आली असून, त्यापैकी ९०% ते ९५% झाडे जगवली व त्यांची उत्तम प्रकारे वाढ झाली असून भविष्यात या ठिकाणी “ऑक्सीजन_हब” निर्माण करण्याचा उद्देश “शिरूरहवेलीमित्र_परिवाराचा” असून,त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात अधिकाधिक प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा मानस असल्याचे या गृपच्या वतीने सांगण्यात आले. तसेच यावेळी “झाडे लावा व झाडे जगवा” असा संदेशही देण्यात आला.
या व्हाट्सऍप ग्रुप अंतर्गत सर्वांनी वर्गणी गोळा करून हा उपक्रम राबविला असून, इतर व्हाट्सऍप ग्रुप ने देखील आदर्श घ्यावा असे आवाहन यावेळी ग्रुपच्या वतीने करण्यात आले. या कामी ग्रुप पुणे जिल्हा भा.ज.पा चे सरचिटणीस व सोरताप वाडीचे माजी सरपंच सुदर्शन भाऊ चौधरी, शिवसेना तालुका प्रमुख सुधीर भाऊ फराटे, पंचायत समितीचे कार्यक्षम सदस्य राजेंद्र गदादे, ग्रुप ऍडमिन अमित मचाले, भा.ज.पा सोशिअल मीडिया चे नितीन थोरात, राष्ट्रवादी सोशिअल मिडियाचे सतीश नागवडे, प्रवीण रणदिवे, सचिन मचाले आदी या वेळी उपस्थित होते. वडगावचे सरपंच सचिन शेलार, दहिवडीचे सरपंच संतोष दौंडकर, सचिन मचाले, तुषार जगताप, दत्तात्रय नांद्रे, राजेंद्र कळसकर, शंकर भाऊ गदादे, सुनील सुभाष गदादे व शिरुर-हवेली मित्र परिवार व्हाट्सऍप ग्रुपचे सदस्य या वेळी उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *