शिक्रापूरच्या कानिफनाथ मंदिराशेजारील विद्युत रोहित्राची दुरुस्ती,नागरिकांमध्ये समाधान 

820

शिक्रापूर,शिरूर : (प्रतिनिधी,राजाराम गायकवाड) – गेले अनेक दिवस शिक्रापूरच्या कानिफनाथ मंदिराशेजारील विद्युत रोहिञाची दयनीय अवस्था झाली होती. काही युवकाच्या पुढाकाराने व कर्मचारी वर्गाने प्रमाणिक कामामुळे हा प्रश्न आता मार्गी लागला आहे. त्यामुळे ग्रामस्थामध्ये समाधान व्यक्त होत आहे . या ठिकाणी असलेल्या खराब प्युजपेटी मुळे सतत प्युज जात असत. पुर्ण फ्युज खराब झाले होते. पर्याय म्हणून फ्युज ऐवजी थेट तारा जोडल्या असल्याने वारंवार ठिणग्या पडत असत.संभाव्य धोका लक्षात घेता परिसरातील नागरिकांनी याबाबत महावितरणला ही माहिती दिली. महावितरणने याबाबत तातडीने फ्युज   पेटी बदलण्याचा आदेश दिला. त्यानुसार येथील सर्व खराब फ्युज बदलुन नवीन टाकण्यात आले. त्यामुळे आता वारंवार लाईट जाणार नाही  व सगळ्यांना व्यवस्थित वीज मिळणार आहे.याकामी महावितरणाचे उप कार्यकारी अभियंता नितीन महाजन, सहाय्यक अभियंता गणेश वागरे, विद्युत कर्मचारी राजेद्र उरमोडे, दता खानजोडे यानी विशेष लक्ष घालुन या कामाला चालना दिली.याबाबत निलेश गायकवाड, रमेश खरपुडे ,प्रमोद खेडकर,अमित गायकवाड यानी महावितरणाकडे वारंवार पाठपुरावा केला होता.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *