मुरबाड मध्ये बालकांचे हक्क व सुरक्षितता जनजागृती सप्ताह संपन्न  

620
      मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – तालुक्यातील विविध शाळा मध्ये जाऊन मुरबाड पोलिसांनी विध्यार्थी वर्गाशी संपर्क साधत बालकांचे हक्क व बालकांची सुरक्षितता याविषयी जनजागृती सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते.
   १४  नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर पर्यंत तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कुल मुरबाड, अनुदानित आश्रम शाळा झापवाडी, सिद्धगड विद्यालय डोंगरन्हावे ,शासकीय आश्रमशाळा काचकोली ,सर्वोदय विद्यालय कुडवली ,हुतात्मा विरभाई कोतवाल हायस्कुल म्हसा, या शाळेत उपस्थित विध्यार्थी व शिक्षक वर्गाला बालकांचे हक्क व त्यांच्या सुरक्षितता या विषयावर व्याख्यान, परिसवाद, प्रशमंजुषा , सायबर क्राईम यावर चर्चा करत जनजागृती केली  या सप्ताहात पोलीस विभागाकडून लहानगे , चौधरी , निकम, विनायक  खेडकर , यांच्या सह महिला कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले भविष्यात या  उपक्रमाचा फायदा बालकांना  होईल असा विश्वास या सप्ताहाच्या शेवटी व्यक्त करण्यात आला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *