वाड्यातील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथेविधी सेवा दिनानिमित्त मार्गदर्शन शिबीर व भव्य रॅली संपन्न

902
            वाडा,पालघर : (प्रतिनिधी,संजय लांडगे) – देशभरात २१ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर रोजी विधी सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने वाडा तालुका विधी सेवा प्राधिकरण व वकील संघटना यांच्या वतीने गुरूवारी तालुक्यातील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश मनोहर शेंदाने यांच्या अध्यक्षतेखाली मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर व जनजागृतीसाठी गावातून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
       सदरच्या शिबिराची प्रस्तावना अँड.संतोष डेंगणे यांनी केली तर अँड.चंद्रकांत पाटील यांनी भारतीय संविधानातील कलमांसहित माहिती, बालकांसाठी असलेली कायदेविषयक सेवा, मुलांचे हक्क, मोटार वाहन कायदा, स्त्रियांचे हक्क, दिवाणी व फौजदारी विषयक असलेले विविध कायदे, कोर्ट फी, वकील खर्च तसेच इतर न्यायालयीन वादात होणारा खर्च, मोफत विधी सहाय्य कोणास मिळू शकते आदींसह तालुका विधी सेवा प्राधिकरणांद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले. तर न्यायाधीश मनोहर शेंदाने यांनी याप्रसंगी विधी सेवा प्राधिकरणाच्या मोफत सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच आपापसातील प्रकरणे समांजस्याने तडजोड करून मिटवण्यासाठी आवाहन केले. या शिबीरास अँड संजय चोथे, अँड. दिलीप पष्टे, अँड. अविनाश साळवे, अँड. जितेंद्र गायकवाड, अँड.सचिन पाटील, अँड.राजेश भोईर, फडके सर,  तहसीलदार उद्धव कदम, पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी, सहा.पो.निरीक्षक गोविंद बोराडे गट विकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे, न्यायालयीन कर्मचारी  सुचिता कथडे, अभिजीत कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला, शिक्षक व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *