लढत रहा मी आहे..!! कुटे यांना वाढदिवसानिमीत्त राज ठाकरे यांच्या शुभेच्छा

875
पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : राज ठाकरे हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते रविवारी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. याप्रसंगी मनसे जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे यांनी यांच्या राज ठाकरे यांच्या पुणे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांनी कुटे यांना वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा देत असताना “लढत रहा मी आहे” अशा शबासकीच्या शुभेच्छा दिल्या.
मनसे महावितरण आंदोलनातील झालेली कारागृहाची शिक्षा, औंरगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ व्हावे यासाठी केलेले आंदोलन तसेच नुकत्याच महागाई विरोधात केलेल्या आंदोलनामुळे मनसेची शिरुर मधील ताकद मजबूत झाली असुन त्याची दखल राज ठाकरे यांनी देखील वेळोवेळी घेतली आहे. या आंदोलनात असणारया कुटे यांनी आज वाढदिवसानिमीत्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत आशिर्वाद घेतले. यावेळी ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा देत “लढत रहा मी आहे” असे कौतुकास्पद संवाद सांगुन शुभेच्छा दिल्या. ठाकरे यांच्या पुणे येथील दौऱ्यादरम्यान वाढदिवसानिमीत्त कुटे व मनसे कामागार आघाडीचे तालुकाध्यक्ष रविंद्र गुळादे यांनी आज त्यांच्या पुणे येथील ‘राजमहल’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मनसेचे नेते राजेंद्र वागस्कर, सरचिटणीस ॲड.किशोर शिंदे  हे उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *