महानुभवपंथीय नर्मदाबाई मारुती भाकरे यांचे वृध्दपकाळाने निधन 

650
      जांबुत,शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजीच्या माळवाडी येथील मुळ रहिवासी व गेल्या १० वर्षांपासून महानुभव पंथातून परमेश्वर सेवेत असलेल्या नर्मदाबाई मारुती भाकरे यांचे आज पहाटे १ च्या दरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८२ वर्षांच्या होत्या.
        गं.भा.नर्मदाबाई मारुती भाकरे या गेल्या १० वर्षांपासून श्रीकृष्ण मंदिर शिंगवे पारगाव येथे परमेश्वर सेवा करीत होत्या. त्यांच्या पश्चात सदाशिव व भीमदास ही दोन मुले,वत्सला ही मुलगी,नातवंडे,पतवंडे असा परिवार आहे. आज गुरुवारी सकाळी १० ला अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांचा अंत्य विधी करण्यात आला. यावेळी महानुभव पंथातीतलं संत,महंत,उपासक,सेवक व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(रिपोर्ट,योगेश भाकरे) –



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *