मुरबाड तालुका खरेदी विक्री संघाकडून भात खरेदीला सुरुवात,शेतकऱ्यांना दिलासा   

632

  मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड तालुका खरेदी विक्री संघातर्फे सोमवार ता 16 पासून भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. आज या केंद्राचे  उद्घाटन ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांचे हस्ते करण्यात आले. पहिल्याच दिवशी 78 क्विंटल भात खरेदी करण्यात आला. भाताला 1815 रुपये हमीभाव अधिक 500 रुपये बोनस असा 2315 रुपये क्विंटल भाव मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  यावेळी संघाचे अध्यक्ष मधुकर केदार,माजी चेअरमन रामभाऊ दळवी,व्हाईस चेअरमन जगन घुडे,ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य किसन गिरा,मोहन भावार्थे उपस्थित होते. प्रत्येक शेतकऱ्याला टोकन दिल्यानंतर त्यांनी आले आधारकार्ड, बँक पासबुक , 7 / 12 उतारा आणणे आवश्यक आहे. भात घालणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात ऑन लाईन रक्कम जमा होणार आहेत अशी माहिती संघाचे व्यवस्थापक पी एस भानुशाली यांनी दिली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *