जेष्ठ पत्रकार सुभाष शेटे यांचा पत्रकारदिनी विलासराव रोहिले यांच्याकडून सन्मान 

230
शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – आपल्या लेखणीतून सर्वसामान्यांचे प्रश्न मुद्देसूदपणे मांडणी करीत ते विनाशर्त प्राधान्याने सोडविण्याचे काम सातत्याने करीत असलेले कवठे येमाई येथील जेष्ठ पत्रकार सुभाष शेटे यांचे पत्रकारिता क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय व भूषणावह असल्याचे मत रोहिलवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते विलासराव रोहिले यांनी व्यक्त केले आहे.
       पत्रकार दिनाचे औचित्य साधत आज गुरुवार दि. ६ ला विलासराव रोहिले यांनी यांनी कवठे येमाई येथे पत्रकार शेटे यांची सदिच्छा भेट घेत त्यांचा शाल,श्रीफळ,फेटा बांधून सन्मान केला. तर पत्रकारितेतून सुरु असलेले सामाजिक कार्य जोपर्यंत हाती लेखणी आहे तोपर्यंत अविरतपणे सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे व सर्मासामान्यांना न्याय मिळेल असे कार्य करीतच राहणार असल्याचे पत्रकार शेटे यांनी सांगितले.
कवठे येमाई गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबुशा पाटील कांदळकर यांच्या हस्ते फेटा बांधून व सामाजिक कार्यकर्ते विलासराव रोहिले यांच्या वतीने पत्रकार सुभाष शेटे यांना शाल,श्रीफळ व पूर्ण पोशाख भेट देऊन गौरविण्यात आले. यावेळी रोहिलवाडीच्या पवार वस्तीतील सामाजिक कार्यकर्ते रामदास पवार व मान्यवर उपस्थित होते.आज पत्रकार दिनी विलासराव लक्ष्मणराव रोहिले यांच्या वतीने पत्रकार शेटे यांचा गौरव करण्यात आला.  तर उपस्थित ग्रामस्थांनी पत्रकार शेटे अण्णा यांचे भिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *