मलठण येथे पत्रकार दिन उत्सहात साजरा

568

पाबळ, ता.शिरूर (-प्रतिनिधी, आमीन मुलानी) : महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण ‘  ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. यानिमित्ताने शिरूर तालुक्यातील मलठण येथे बाळशास्त्री जांभेकर ‘दर्पण’ वृत्तपत्राचे सर्वेसर्वा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ०६ जानेवारी  रोजी सायंकाळी ८ वाजता पत्रकार दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांच्या आयोजनात पार पडला. यावेळी पंचक्रोशीतील नामवंत पत्रकार बांधव उपस्थित होते. तेव्हा समाजशील न्यूज चे कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार सुभाष शेटे यांनी पत्रकारितेचे महत्त्व आपल्या धारदार वाणीतून स्पष्ट केले. तर सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब डांगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच राजेंद्र गावडे यांनी आपल्या प्रखर वकृत्वशैलीतून पत्रकारांविषयी त्यांना आलेले अनुभव व्यक्त केले. सर्व पत्रकार बांधवांना फेटा बांधून आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास मलठण गावचे सरपंच तसेच कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *