दहावीनंतर पुढे काय ? जयहिंद पॉलिटेक्निकच्या वतीने वेबिनारचे आयोजन

379
नारायणगाव, ता.जुन्नर (-प्रतिनिधी,अतुल कांकरिया) : विद्यार्थ्यांनी आतापर्यंत घेतलेल्या शिक्षणामधील विषयांचा विचार करून आत्मपरिक्षण करावे व त्यानुसार पुढील करिअरची निवड करावी असे मत प्रा. विवेक वेलणकर यांनी ऑनलाईन वेबिनारमध्ये व्यक्त केले. जयहिंद पॉलिटेक्निकच्या वतीने दहावीनंतर पुढे काय ? या विषयावर वेबिनारचे चे आयोजन केले होते. या वेबिनारला जयहिंद शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, सचिव विजय गुंजाळ, संचालिका शुभांगी गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्हे ,प्राचार्य योगेश गुंजाळ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

तांत्रिक शिक्षण ही काळाची गरज आहे, तसेच कोरोना महामारीनंतर जगातील व्यवसाय व उद्योगक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. या बदलाचा विचार करता भारतामध्ये स्टार्टअप साठी पोषक वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्यास पुढील काळात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असतील. परंतू केवळ नोकरीचा विचार न करता व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रात करिअरच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध असल्याचे प्रा. वेलणकर यांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच दहावीनंतर विविध अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया कशी राबविली जाते व त्यासाठी काय शैक्षणिक प्रात्रता असणे आवश्यक आहे याबाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली व विद्यार्थ्यांचे शंका-निरसन केले. या ऑनलाईन वेबिनारमध्ये ३५० हून अधिक पालक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रास्ताविक प्रा. हेमंत महाजन यांनी केले तर प्रा. स्वप्निल पोखरकर यांनी आभार मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *