नवनिर्वाचित सरपंचांना प्रशिक्षण देण्यासाठी कांदळी गावचे लोकनियुक्त सरपंच विक्रम भोर यांची निवड

284

नारायणगाव, ता.जुन्नर (-प्रतिनिधी,अतुल कांकरिया) : राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत राज्यातील नवनिर्वाचित सरपंच यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रवीण प्रशिक्षक म्हणून पुणे जिल्ह्यातून कांदळी गावचे लोकनियुक्त सरपंच विक्रम भोर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान २०२१-२२ अंतर्गत नवनिर्वाचित सरपंचांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रवीण प्रशिक्षक यांचे बारामती शारदा नगर येथे दि १५ ते दि १७ असे तीन दिवसांचे निवासी प्रशिक्षण ऑफलाइन पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. राज्यामध्ये सरपंचाचे निवडणूक होऊन ३४ जिल्ह्यातून १५ हजार सरपंच नव्याने निवडून आले आहेत. या नवनिर्वाचित सरपंच यांना राष्ट्रीय ग्रामीण स्वराज्य अभियानाअंतर्गत तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बारामती शारदा नगर येथे १५ जुलै ते १७ जुलै असे तीन दिवस निवासी प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणासाठी पुणे जिल्ह्यातून सरपंच विक्रम भोर यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात प्रथम डिजिटल ग्रामपंचायत म्हणून ओळख असणाऱ्या जुन्नर तालुक्यात कांदळी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच म्हणून विक्रम भोर हे निवडून आले आहेत . विक्रम भोर यांना डिजिटल ग्रामपंचायत व पेपरलेस ग्रामपंचायत या विषयाचे सादरीकरण व प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *