कोहिनूर नावाने बनावट आटा चक्की विक्री करणाऱ्या अकोल्यातील शेतकरी मशिनरीवर पोलिसांचा छापा

1015
 नारायणगाव, ता.जुन्नर (-प्रतिनिधी,अतुल कांकरिया) : कोहिनूर नावाने बनावट आटा चक्की विक्री करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील शेतकरी मशीनरी दुकानावर पोलिसांनी छापा टाकून ८ लाख 16 हजार या किमतीच्या ९६ बनावट चक्क्या जप्त केल्या आहेत. हि कारवाई बुधवार दि.१४ जुलै रोजी अकोले येथे रात्री उशिरा करण्यात आली. हा छापा नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व त्यांच्या पथकाने केली आहे.
बनावट कोहिनूर नावाने आटा चक्की विक्री करणारे शेतकरी मशीनरी अकोले येथील दुकानाचे मालक सुधीर प्रकाश गडाख वय ३७ रा.संगमनेर जि.अहमदनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद विनोद सेल्स कॉर्पोरेशनचे संचालक पराग अशोककुमार शहा यांनी दिली आहे. यापूर्वी ७ जुलै रोजी बनावट आटा चक्की सील करण्याची पहिली कारवाई नारायणगाव (वारूळवाडी) येथील गडाख मशीनरी यांच्या दुकानावर छापा टाकून करण्यात आली होती. त्यावेळी या दुकानात १४ लाख ९७ हजार किमतीच्या १७५ बनावट आटा चक्क्या नारायणगाव पोलिसांनी जप्त केल्या होत्या. गडाख मशीनरीचे मालक सुधीर प्रकाश गडाख यांच्यावर पहिला कॉपीराईट चा गुन्हा दाखल झाला होता. तो बनावट माल नारायणगाव पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर बनावट आटा चक्की संदर्भात पुढील तपास सुरु केला असता  पोलिसांना अशाच प्रकारची बनावट आटा चक्कीची विक्री अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील सुधीर गडाख यांच्या मालकीचे शेतकरी मशीनरी येथे होत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि.१४ जुलै रोजी छापा टाकून ८ लाख १६ हजार किमतीच्या ९६ बनावट चक्क्या जप्त केल्या आहेत. या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे  यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, कोहिनूर नावाच्या बनावट आटा चक्क्या कोणी विक्री करत असेल तर त्यांनी नारायणगाव पोलिसांशी ०२१३२ – २४२०३३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *