विद्युत कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचले अनेकांचे प्राण

359

पातूर, अकोला (-प्रतिनिधी,श्रीधर लाड) : अकोला जिल्ह्यातील तालुका पातुर ते अकोला मार्गावर वीज वाहून नेणाऱ्या तारा रस्त्यावर लोंबकळत असल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. परंतु पातूर येथील विद्युत कर्मचारी अक्षय मालसुरे यांच्या समयसूचकते नुसार वाहन चालकांसह प्रवाशांचे वाचले प्राण. अकोला जिल्ह्यातील तालुका पातुर ते अकोला मुख्य मार्गावर असलेल्या बाळादेवी कॉन्व्हेंट जवळ विद्युत सप्लायची सर्व्हिस वायर, वादळ वाऱ्यामुळे रोडवर खाली आल्याने वाहन चालकांना मोठा अडथडा निर्माण झाला होता. छोटी वाहने सदर वायर खालून सहज निघून जात होती परंतु मोठ्या वाहनांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे दोन्ही कडून येणाऱ्या वाहनांची रस्त्यावर रांग लागली होती. परंतु पातूर विद्युत कार्यालयाचे कर्मचारी अक्षय मालसुरे यांनी वेळ न दवडता बसवर चढून हाताने वायरला वर उचलून धरून ठेऊन खोळंबलेल्या वाहनांची गर्दी कमी केली. तर नंतर विद्युत सप्लाय बंद करून लोंबकळलेल्या वायरला उंच करण्यात आले. सदर वायर तुटून वाहनावर पडली असती तर अनेकांच्या प्राणास घातक ठरली असते. परंतु अक्षय मालसुरे यांच्या समयसूचकतेमुळे दुर्घटना घडली नाही. आणि वायरमुळे थांबलेल्या वाहनांचे दळण वळण सुरू झाले. वीज कर्मचारी अक्षय मालसुरे यांच्या समयसूचकता व धाडसाचे परिसरातून कौतुक होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *