बिरसा फायटर्स कोकण विभाग कार्याध्यक्ष पदी राजाभाऊ सरनोबत यांची निवड

351

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या बिरसा फायटर्स संघटनेच्या कोकण विभाग कार्याध्यक्षपदी मुरबाड मधील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ सरनोबत यांची निवड करण्यात आली आहे. बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 23 जून रोजी झालेल्या ऑनलाईन सभेत ही निवड करण्यात आली. या सभेत कोकण विभागातील पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून बिरसा फायटर्सचे संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी राजाभाऊ सरनोबत यांची कोकण विभाग कार्याध्यक्ष पदी निवड केल्याचे घोषित केले. तत्पूर्वी राजाभाऊ सरनोबत यांनी बिरसा फायटर्स संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश जाधव यांनी सुद्धा राजाभाऊ सरनोबत यांना कोकण विभाग कार्यकारिणीत घ्यावे असे सुचवले होते. राजाभाऊ सरनोबत हे आदिवासी संघर्ष समिती मुरबाड तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होते. त्याचबरोबर त्यांना आदिवासी एकता परिषदेमध्ये काम करण्याचा अनुभव आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *