मुरबाड नगरपंचायतमधील काँग्रेस चा एकमेव नगरसेवक भाजपात दाखल

401
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड नगरपंचायतच्या निवडणूक वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले असताना निवडणूक प्रतीक्षा सगळेच करत आहेत. यासाठी राजकीय बदल पहायला मिळत असून, मुरबाड नगरपंचायत मधील काँग्रेसचा एकमेव नगरसेवक रविंद्र देसले यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष व आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी देसले यांनी आपण काँग्रेस पक्षातील गटबाजी व भविष्यातील राजकिय सुरक्षा यामुळे आपण काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुरबाड मध्ये आले असता तालुक्यातील कुणालाही विश्वासात न घेता जिल्हासरचिटणीस पदावर विराजमान असलेल्या चेतनसिह पवार यांना काँग्रेस तालुकाध्यक्ष पदी विराजमान करून माजी अध्यक्ष कृष्णकांत तुपे यांना जिल्हा कमिटीत घेऊन खांदे पालट करत मुरबाड काँग्रेसला धक्का दिला. तर काँग्रेसच्या पडत्या काळात मुरबाड मध्ये काँग्रेसचा नगरसेवक निवडून आणणाऱ्या पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून मिळणारी वागणूक यामुळे आपण पक्ष सोडत असून राजकिय सुरक्षेसाठी आपण काँग्रेस सोडत असल्याचे सांगितले. यामुळे मुरबाड नगरपंचायात निवडणुकीपूर्वी राजकीय बदलाचे वारे पहायला मिळत आहे. तर यापूर्वी भाजपचे नगरसेवक तसेच बांधकाम सभापती नितीन तेलवणे यांनी शिवसेनेत प्रवेश करून भाजपला धक्का दिला होता.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *