कोकणातील पूरग्रस्त बांधवांसाठी कोरेगाव भीमातून 100 किट रवाना

369

कोरेगाव भीमा,ता.शिरूर (-प्रतिनिधी, गजानन गव्हाणे) : कोरेगाव भीमा येथील ग्रामस्थ कायमच मदतीसाठी पुढे येत असतात. सामाजिक बांधिलकी जपत आपल्या कोकणातील पूरग्रस्त बांधवांसाठी या वर्षीही कोरेगाव करांनी भरघोस मदतीचा हात देऊ केला आहे. रोहितदादा पवार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व माणुसकी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी छोटीशी मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूचे 100 किट तयार करण्यात आले. शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर जीवनावश्यक किट चिपळूणला पाठवण्यात आले. यावेळी कोरेगाव भीमाचे सरपंच अमोल गव्हाणे, माजी सरपंच विजय गव्हाणे, संदीप ढेरंगे, माजी उपसरपंच दत्तात्रय ढेरंगे, उद्योजक सत्यनारायण ढेरंगे, शिरूर खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक गव्हाणे, माणुसकी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य विष्णू गोळेकर, ग्रा. पं. सदस्य अनिकेत गव्हाणे, केशव फडतरे, उद्योजक कृष्णा ढेरंगे, जगदीश ढेरंगे, संपत गव्हाणे, विराज दाभाडे, शेरखान पठाण, ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले, मच्छिद्र ढगे, राम ढेरंगे, साईनाथ मेटे व रोहित दादा पवार प्रतिष्ठान चे कार्यकर्ते यांच्या उपस्थितत चिपळूण ला पाठवण्यात आले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *