टोकियो ऑलिम्पिक : पुरुष हॉकी संघाचा ऐतिहासिक विजय ; कांस्यपदकाची कमाई

306
समाजशील वृत्तसेवा : भारतीय संघाने जर्मनी संघाला 5-4 ने हरवत टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये कांस्यपदकाची कमाई केली. तब्ब्ल ४१ वर्षांनंतर भारतीय हॉकी संघाने हि कामगिरी केली आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाच्या कामगिरीमुळे तमाम भारतवासियांची मान अभिमानाने उंचावली आहे. भारताने हॉकीमध्ये शेवटचे पदक १९८० साली जिंकले होते. यामध्ये भारतासाठी सिमरनजीत सिंहने दोन, हरमनप्रीत सिंह, रुपिंदर पाल सिंह आणि हार्दिक सिंहनं प्रत्येक एक-एक गोल करत सामन्यात जर्मनीवर मात करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली. तर भारताचा गोलकिपर श्रीजेशनं जबरदस्त खेळी करत जर्मनीचे अनेक गोल परतवून लावले. श्रीजेशच्या अभेद्य भिंतीमुळेच भारताचा विजय सोपा झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *