अलिबाग,रायगड : ग्रामिण भागातील नवीन खेळाडु विकसीत होण्यासाठी शासन प्रयत्नशील परंतु पालकांनी सकारात्मक विचार करणे गरजेचे – ललिता बाबर, महीलांमधील कँन्सर व लसीकरणाची जनजाग्रुती करीता माणगाव रोटरी क्लब तर्फे मँरोथाँन चे आयोजन

595
           अलिबाग,रायगड : माणगाव रोटरी क्लब ने महीलांचे कँन्सर व लसीकरणाच्या जनजाग्रुती साठी आयोजन केलेल्या मँरोथाँन ला भारताची आँलम्पिक विजेती ललिता बाबर हीने झेडांं दाखवुन पहाटे ६.३० च्या सुमारास मँरोथाँन ला सुरुवात केली.आज पहाटे पाच वाजल्यापासुनच मुबंई गोवा हायवेवरील माणगाव जवळ लहानापांसुन वयोव्रुद्धा पर्यंत, महीला पुरुष, युवक युवती, बच्चेकपंनी मँरोथाँन मध्ये पळण्यासाठी ढालघर फाट्यावर एकत्र जमले. आयोजक मँरोथाँनच्या ईवेटं ची तयारी करतच होते.
पाँस्को स्टील या उद्योगाने या कार्यक्रमाचे प्रायजोकतेचा भार उचलला. या कार्यक्रमाला ६०० पेक्षा जास्त खेळांडुनी सहभाग घेतला होता. २१ किमी, ११ किमी, ५ किमी च्या मँरोथाँन रन ठेवल्या होत्या प्रत्येक रन मध्ये महीला पुरुष, जेष्ट नागरीक, खुला गट अश्या विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. २१ किमी च्या गटात रणजित कुमार ने पहिला क्रमांक पटकावला तर ७ वर्षाच्या करुणा लेढीं या माणगाव येथील वनवासी आश्रम शाळेतील आदीवासी विद्यार्थीनिने लहान मुलांच्या गटात ५ किमी मध्ये  पहिला क्रमांक पटकावित सर्वांनाच आश्यर्याचा धक्का दिला.
              या स्पर्धेमध्ये केनियातील आतंरराष्ट्रीय धावपटु ईवाँथ रोनाल्ड याने ही सहभाग घेतला होता. भारतामध्ये ही त्याची चौथी स्पर्धा होती तर चिन, ब्राझील,कोरीया सह अनेक मँरोथाँन स्पर्धेमध्ये विजेता ठरला आहे.
– प्रतिनिधी,सारिका पाटील,(सा.समाजशील,अलिबाग



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *