राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं ; आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार – मोदींची घोषणा 

332

नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंना देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले असून हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आहे.

नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत या पुरस्कारबाबत घोषणा केली. यावेळी ते म्हणले, "भारतभरातील नागरिकांकडून मला खेल रत्न पुरस्कारासाठी मेजर ध्यानचंद यांचे नाव असावे अनेक विनंत्या येत आहेत. त्यांच्या मतांसाठी मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्या भावनांचा आदर करून, खेलरत्न पुरस्कार आत्तापासून मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाईल !"

काय आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे स्वरुप?
एक पदक, प्रमाणपत्र आणि 25  लाख रुपयांची रक्कम असं राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं स्वरुप आहे. 2018 पर्यंत राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांची रक्कम 7.5 लाख रुपये होती.. 2018 पासून पुरस्काराच्या रकमेत वाढ करुन ती 25 लाख रुपये करण्यात आलीय.

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *