सादलगाव,पुणे : शिरूरच्या पूर्व भागातील गणपतीमाळ येथील काकडा आरतीची सांगता,तर आज संकष्टी चतुर्थीस दर्शनासाठी भाविकांची गर्दी

507
          सादलगाव,पुणे : शिरूरच्या पूर्व भागातील सादलगावच्या गणपतीमाळ येथील सुप्रसिद्ध गणपती मंदिरात सुरु असलेल्या काकडा आरतीची सांगता त्रिपुरी पौर्णिमेस करण्यात आली. तर आज संकष्टी चतुर्थीस येथील श्रीगणेशाच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.
          वारकरी संप्रदायातील संत सज्जनांच्या भक्तीमय वातावरण संपन्न होत असलेल्या काकडा आरतीची नुकतीच मोठ्या भक्तीभावाने सांगता करण्यात आली. कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमे पर्यंत दररोज पहाटे देवाला जागविण्यासाठी गणपतीमाळ येथील मंदिरात काकडारती करण्याची पद्धत प्रचलित आहे. दररोज आरतीनंतर विविध भजने, अन्य आरत्या व स्तोत्रे म्हटली गेली. भगवान श्रीकृष्णाच्या लीला वर्णन करणारी गीतेही यामध्ये समाविष्ट होती.
         काकड आरती समारोप कार्यक्रमा प्रसंगी जयराम खळदकर,आबा काळे,सोनबा चांदगुडे,संजय शेलार,बाळू शेलार, पुजारी सुरेश काका नगरकर,भरत वाबळे,अशोक बांडे,चंद्रकांत ढमाळ,संतोष कदम माउली मोरे, ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या.
– प्रतिनिधी,पांडुरंग काळे,(सा.समाजशील,सादलगाव)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *