अलिबाग,रायगड : मांडुळ प्रजातीचे साप विक्री करणारी टोळी जेरबंद, रायगड गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

801
          अलिबाग,रायगड : शुक्रवार दिनांक 23 नोव्हेबर 2018 रोजी तिघे जण 2 मुख असलेले जीवंत मांडुळ प्रजातीचा साप विकण्यासाठी हॉटेल राबगांव व्हिलेज मु.पो.राबगांव ता.सुधागड जि.पाली येथे येणार  असल्याची खबर रायगड गुन्हे अन्वेषण शाखेला खब-या मार्फत मिळाली होती. त्यासंदर्भात पोलीस निरीक्षक जे.ए.शेख यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून हॉटेल राबगांव व्हिलेज येथे सापळा लावण्यात आला होता. सायंकाळी 18.45 वा.च्या दरम्यान खब-याने दिलेल्या वर्णनाप्रमाणे 03  इसम हॉटेल राबगांव च्या दिशेने येताना दिसले. त्यापैकी एका इसमाच्या हातात पिवळया रंगाची कापडी पिशवी होती. सदर इसमांबाबत संशय आल्याने त्यांना हॉटेल राबगांव व्हिलेज मध्ये प्रवेश करत असतानाच पोलिसांनी  त्यांना अडवून चौकशी केली.
           तसेच त्यांची अंगझडती घेतली असता एका इसमाच्या हातात असलेल्या पिवळया रंगाच्या पिशवीमध्ये 03 मांडुळ प्रजातीचे (वन्यजीव) सर्प आढळून आले. त्याबाबत त्यांनी सदरचे सर्प हे विक्रीकरीता आणले असून त्याचा वापर हा काळी जादू व औषधी पदार्थ तयार करण्यासाठी होत असल्याचे सांगितले. सदर मांडुळ प्रजातीचे (वन्यजीव) प्राण्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे 1,10,00,000/- इतकी असून इसम नामे 1) जयंत बाळकृष्ण देशमुख वय-59 रा. आतोणे ता.सुधागड जि.रायगड 2) मिलींद भास्कर मोरे वय-46 रा.शिहू ता.पेण जि.रायगड 3) रोहीदास लक्ष्मण तांडेल वय-44 रा. पाली, ता.सुधागड यांच्याविरूध्द पाली पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. 75/2018 वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 39(3) सह कलम 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात वरील 03 आरोपी यांना अटक करण्यात आली असून त्यांनी सदरचे मांडुळ सर्प कोठून मिळविले व यापूर्वी किती सर्पांची विदेशात आंतराराष्ट्रीय टोळीला विक्री केली याबाबत पुढील तपास पाली पोलीस  करीत आहेत. सदर मांडुळ प्रजातीचे (वन्यजीव) सर्प सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाचे ताब्यात देण्यात आले आहेत.
         सदरची कारवाई अपर अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या   मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे.ए.शेख, सपोनि दिलीप पवार आणि पोलीस पथकाने पार पाडली आहे.
– प्रतिनिधी,सारिका पाटील,(सा.समाजशील,अलिबाग)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *