नीरा नरसिंहपूर,पुणे : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतले लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन

435
     श्री क्षेञ निरा नरसिंहपूर येथे माजी मंञी हर्षवर्धन पाटील यांनी लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन घेतले
        नीरा नरसिंहपूर,पुणे : इंदापूर तालुक्यातील श्री क्षेञ निरा नरसिंहपूर येथील प्रसिद्ध लक्ष्मी नृसिंह मंदिरात जाऊन राज्याचे माजी मंञी हर्षवर्धन पाटील यांनी आज शनिवार दि.24 श्री लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन घेतले. तसेच पाद्यपूजा केली.या विधीचे पौंराहीत्य मंदिराचे पुजारी प्रसाद दंडवते यांनी केले.
        यावेळी लक्ष्मी लक्ष्मी-नृसिंह देवस्थानच्या वतीने सहाय्यक व्यवस्थापक नारायण दंडवते यांनी हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस पाटील अभय वांकर यांनी केले.या प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, लक्ष्मी नृसिंह मंदिराचे परिसरातील खोल्या पाडून तेथे वाव-या बांधल्या जाव्यात तसेच श्री लक्ष्मी नृसिंहाचे नित्योपचार हे पुरातत्व खात्याच्या सूचनेनुसार होणे गरजेचे आहे.
        यावेळी निरा भिमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील,बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील,नरसिंहपूरचे उपसरपंच विलास ताटे देशमुख, नाथाजी मोहीते,अभय वाॅकर, प्रकाशराव मोहीते, संजय बोडके, दादा पाटील,बापू जगदाळे, शरद जगदाळे, राजेंद्र निंबाळकर, वर्धमान बोडके, तुकाराम बोडके,रघुनाथ सरवदे, डाॅ.सिध्दार्थ सरवदे आदींसह ग्रामस्थ व कार्यकर्ते  उपस्थित होते.
– प्रतिनिधी,बाळासाहेब सुतार,(सा.समाजशील,निरा नरसिंहपूर)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *