१४ व्या वित्त आयोगाचा निधी एकत्रित करून ग्रामपंचायतींना मिळाल्या नविन अदयावत रूग्णवाहिका

349

जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष विवके वळसे पाटील यांच्या उपस्थितलोकार्पण सोहळा संपन्न 

घोडेगाव, ता.आंबेगाव (-प्रतिनिधी,सीताराम काळे) : आंबेगाव तालुक्यातील पेठ, डिंभे बु., आडिवरे, तळेघर, धामणी, निरगुडसर या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना काही ग्रामपंचातींचा १४ व्या वित आयोगाचा निधी एकत्रित करून जिल्हा परीषद पुणे यांनी कोरोनाच्या पार्ष्वभूमिवर नविन अदयावत रूग्णवाहिका दिलेल्या आहेत. त्यांचा लोकार्पण सोहळा पंचायत समिती आंबेगाव येथे जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष विवके वळसे पाटील यांच्या उपस्थित पार पडला. कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सुचनेनुसार आंबेगाव तालुका व इतर तालुक्यांसाठी पुणे जिल्हा परीषद यांच्या माध्यमातून १४ व्या वित्त आयोगातील शासन निर्णयानुसार २५ टक्के निधी आरोग्य, शिक्षण विभाग या बाबींवर खर्च करण्याबाबत निर्देश २०१९-२० या आर्थिक वर्षात देण्यात आले. पहिल्या टप्यात ५१ रूग्णवाहिका घेण्यात आल्या असुन प्रत्येक प्राथमिक केंद्रांना एक याप्रमाणे ९७ रूग्णवाहिका होणार आहे.
सदर रूग्णवाहिकेचे कार्यक्षेत्र हे ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र निश्चित करण्यात आलेले असून सर्व रूग्णवाहीका सुसज्ज आहेत. रूग्णवाहिकेचा वाहनचालक व इंधन यांचा खर्च पुणे जिल्हा परीषदेमार्फत करण्यात येणार आहे. सध्याच्या कोव्हिड -१९ या संसर्गजन्य महामारीच्या काळात व इतर दिवशीही सर्वसामान्य जनतेला या रूग्णवाहिकेंचे खूप मोठे मदतकार्य होईल, असे जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परीषद सदस्य व गटनेते देविदास दरेकर, सदस्या रूपाली जगदाळे, पंचायत समिती सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, नंदा सोनावले, गटविकास अधिकारी जालींदर पठारे, दादु जाधव, दिपक गाडीलकर आदि उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *