नीरा नरसिंहपूर,पुणे : बावडा – नरसिंहपूर राज्य मार्गावरील जाधव फार्म ( टणू ) येथे ऊसाची ट्राॅली विज वाहक तारांना ऊस अडकून पडल्याने दिवसभर वाहतुकीचा खोळंबा,तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळेच अपघात घडत असल्याचा नागरिकांचा आरोप

633
  बावडा नरसिंहपूर राज्य मार्गावर जाधव फार्म (टणू)येथे ऊसाने भरलेल्या ट्राॅल्या पडल्याने दिवसभर वाहतुकीचा खोळंबा झाला      
            नीरा नरसिंहपूर,पुणे : बावडा नरसिंहपूर राज्य मार्गावरील जाधव फार्म ( टणू ) येथे ऊसाची ट्राॅली विज वाहक तारांना ऊस अडकून पडल्याने दिवसभर वाहतुकीचा खोळंबा होता. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळेच अपघात घडत असल्याचा नागरिकांचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
         बावडा – नरसिंहपूर राज्य मार्गाच्या दुस-या टप्प्याचे काम रखडल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. तिर्थक्षेत्र श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानच्या दर्शनासाठी तसेच दशक्रियासह विविध विधी करण्यासाठी शेकडो भक्त व नागरीक मोठ्या प्रमाणात याच वाताहात झालेल्या रस्त्याने  दररोज येत असतात.तसेच खाजगी व  भाडोत्री वाहने देखील मोठ्या प्रमाणात याच रस्त्याने ये जा करीत असतात. . त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचा मोठा ताण वाढला असल्याचे चित्र पाहावयास आहे.
           सध्याला साखर कारखान्याचा हंगाम सुरू असून ऊसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात याच मार्गाने सुरू असल्याने रस्त्यावर मोठी वर्दळ आहे. तसेच ट्रॅक्टर चालक ट्राॅल्यात क्षमतेपेक्षाही ज्यादा ऊस भरत असल्याने रस्त्याने ऊस पाडत जाणे, रस्त्यावरून गेलेल्या विज वाहक तारा न बघता तोडून निघून जाणे, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱयांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. रस्त्यावरच ऊसाची ट्राॅली पडल्याने एसटी बस, ऊसाची वाहने, खाजगी गाड्या तसेच लहान मोठी वाहने अडकून पडल्यामुळे त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांबरोबर प्रवाशी व भक्तांना बसला आहे.
 माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे नरसिंहपूरला दर्शनासाठी आले असता उसाची ट्राॅली पडल्याचा त्रास त्यांनाही सहन करावा लागला. मात्र क्षमतेपेक्षाही ज्यादा ऊस भरणारे ट्रॅक्टर चालक, मालकांना माजीमंत्री यासंदर्भात जाब विचारणार का ? असा सवाल नागरिकांनी केला. तर बांधकाम विभाग अधिकारी व कर्मचारी वर्ग या रस्त्याच्या दुरुस्ती कामी दुर्लक्ष करत असल्याने अपघात घडत आहेत असा आरोप नागरिकांमधून होत आहे.
– प्रतिनिधी,बाळासाहेब राऊत,(सा.समाजशील,नीरा नरसिंहपूर)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *