मुरबाड,ठाणे : कल्याण -मुरबाड रेल्वे मार्गाचा सर्वे रिपोर्ट सकारात्मक, कामासाठी अर्थिक तरतुद करण्याकरीता प्रयत्नशिल – खासदार कपिल पाटील

882
            मुरबाड,ठाणे : कल्याण -मुरबाड रेल्वे मार्गाचा सर्वे रिपोर्ट सकारात्मक आला असून या कामासाठी आगामी बजेट मध्ये अर्थिक तरतुद करण्याकरीता प्रयत्नशिल असल्याचे प्रतिपादन खासदार कपिल पाटील यांनी मुरबाड येथे केले. मुरबाड येथील विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी  मुरबाड शहरातील तलावाचे सुशोभीकरण व सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
          कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किसन कथोरे, ठाणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष दयानंद चोरगे, ठाणे जिल्हा परिषदेचे भाजपचे गट नेते उल्हास बांगर, मुरबाड नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा शीतल तोंडलीकर, उपनगराध्यक्षा अर्चना विशे, मुरबाड तालुका भाजप अध्यक्ष जयवंत सूर्यराव उपस्थित होते
          महाराष्ट्र शासनाच्या नगर उत्थान योजने अंतर्गत मुरबाड शहरातील विविध ठिकाणी 5 कोटी रुपये खर्चाचे सिमेंट काँक्रीट रस्ते तयार करण्यात येणार आहेत.  महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या 105 नगर पंचायती पैकी सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी निधी मिळवणारी मुरबाड हि एकमेव नगर पंचायत असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सा. समाजशीलशी बोलताना सांगितले.
           मुरबाडच्या नगराध्यक्षा शीतल तोंडलीकर यांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांनी मानसिकता बदलावी घंटा गाड्यामध्ये कचरा टाकण्याचे आवाहन केले. नगरसेविका छाया संतोष चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार सचिन कुंभार यांनी मानले.
–  प्रतिनिधि,जयदीप अढाईगेे,(सा.समाजशील,मुरबाड)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *