पिंपरी चिंचवड येथे उभारणार भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी

366

मुंबई (समाजशील वृत्तसेवा) : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, भविष्यातील वैज्ञानिक घडविणे यासाठी पिंपरी चिंचवड येथे जागतिक दर्जाची, विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतला असल्याचे ट्विट महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. तसेच२१ व्या शतकातील भारत घडविण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची गरज ओळखून भारताला समृद्ध करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे, या अनुषंगिक जिज्ञासा निर्माण करणे, तंत्रज्ञानाचा सामाजिक विकासासाठी उपयोग करणे, आनंददायी पद्धतीने विज्ञान शिकवणे, अनुभवात्मक शिक्षण, विज्ञानावर आधारित विविध संकल्पनांचे सादरीकरण, प्रदर्शन आदी बाबी विचारात घेऊन त्याची माहिती आणि ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यासाठी राज्यात जागतिक दर्जाच्या भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरीची स्थापना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *