कवठे येमाईच्या राजमाता जिजाऊ ग्रुप च्या वतीने दहीहंडी सोहळा साजरा

453

कवठे येमाईच्या राजमाता जिजाऊ ग्रुप च्या वतीने दहीहंडी सोहळा साजरा
          शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील  कवठे येमाईच्या राजमाता जिजाऊ ग्रुप च्या वतीने दहीहंडी सोहळा साजरा करण्यात आला.  मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या दहशतीने सन,उत्सव जवळपास बंदच आहेत. या वर्षी मात्र येथील महिलांनी ग्रामपंचायत सदस्या वैशाली रत्नपारखी यांच्या सहकार्यातून श्रीकृष्ण जन्मअष्टमीचा दहीहंडी सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा केला.
यावेळी वैशाली रत्नपारखी,मीना ताई डांगे,सविताताई इचके,माजी सरपंच संगीता रोहिले,रंजना कुंभार,सुनीता काळे,रंजना जाधव,अलका कुंभार,अश्विनी धर्माधिकारी,रेखा कांदळकर,रितू रावल,धनश्री तावरे,लक्ष्मी भंडारी,पुष्पा गोसावी,संगीता कदम,संगीता पंचरास,राणी सांगडे अश्विनी गायकवाड,अलका कुंभार,ज्योती धर्माधिकारी इत्यादी महिला उपस्थित होत्या. पारंपारिक रूढीने चालत आलेली आपली संस्कृती जपली पाहिजे या विचारांनी या वर्षी महिलांनी कवठे येमाईच्या बालाजी मंगल कार्यालयाच्या प्रांगणात अत्यंत छोट्या पद्धतीने कृष्ण जन्मअष्ठामीचा सोहळा विशेषतः दहीहंडी महिलांनी साध्या पद्धतीत साजरी केली. यावेळी बालगोपाळांचा या कार्यक्रमात सहभाग होता. भगवान श्रीकृष्णची  शिवांश जाधव या चिमुकल्यास उत्कृष्ठ वेशभूषा करण्यात आली होती. तर राधाची भूमिका ईशिका गायकवाड हिने पार पाडली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *