मांडवगण फराटा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे गरजेचे – पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे यांची मागणी 

435
मांडवगण फराटा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे गरजेचे – पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे यांची मागणी 
तांदळी,शिरूर : (सा.समाजशील वृत्तसेवा) – लोकसंख्या आणि क्षेत्रफळात विस्तीर्ण असलेल्या शिरूर तालुक्यात शिरूर,रांजणगाव एम आय डी सी आणि शिक्रापूर ही ३ मुख्य पोलीस स्टेशन असून मांडवगण फराटा येथे पोलीस दूरक्षेत्र आहे. पूर्व भागातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग,परिसरातील उद्योगधंदे,वाढती लोकसंख्या लक्षात घेत शिरूर तालुक्याच्या पूर्व भागाकरिता शासनाने मांडवगण फराटा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे करावे अशी मागणी शिरूर पंचायत समितीचे कार्यक्षम सदस्य राजेंद्र पोपटराव गदादे यांनी केली आहे.  तालुक्याच्या पूर्व भागात व पुणे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला तांदळी,इनामगाव,बाभुळसर,गणेगाव,मांडवगण फराटा व इतर ही गावे वाड्यावस्त्या आहेत.पूर्व भागाच्या अनेक गावातूनच मुंबई – लातूर राष्ट्रीय महामार्ग जात आहे.साहजिकच परिसरातून दळणवळण,रहदरीबरोबरच गुन्हेगारी ही वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे मांडवगण फराटा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे अस्तित्वात आले तर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *