मुरबाडमधील वीज कर्मचाऱ्याची आत्महत्या ; मुरबाड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

1326
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड मधील विदुयत महामंडळाचा कर्मचारी सुरेश अहिरे (54) यांनी दि 15 सप्टेंबर रोजी मुरबाड शिरगाव रस्त्यावर असलेल्या घोडदेश्वर येथे विष प्राशन करून नदी प्रवाहात जाऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांचा कुठेही तपास लागत नसल्याने पोलीस यंत्रणा, अग्निशमन दल, देवगाव ग्रामस्थ यांचे शोधकार्य सुरू असताना 17 सप्टेंबर रोजी याच परिसरात असलेल्या केटी बंधाऱ्या लगत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यापासून मुरबाड चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी आपल्या टीम सह ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य सुरू असताना घोडदेश्वर परिसरात त्यांचा मोबाईल मोटरसायकल, काही वस्तू तसेच सुसाईड नोट सापडली होती. या सुसाईड नोटच्या आधारावर सुसाईड नोट मध्ये उल्लेख असलेल्या प्रभाकर पाटील व संजय शिर्के या दोघावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. या दोघांनी 10 लाख रुपयांची मागणी वारंवार केल्याने मी आत्महत्या करत असल्या बाबत चिठ्ठीत उल्लेख असल्याने पोलिसांनी तपास सुरू केला असता यातील संजय शिर्के यास पोलिसांनी ताब्यात घेण्यात यश आले. तर प्रभाकर पाटील अजून हाती लागला नसल्याचे सांगण्यात आले. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक बसवराज शिवपुजे व वरिष्ठ पो.नि. प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरीक्षक तोडकर हे करत आहे. या आत्महत्या मागील नेमके कारण काय ? याचा शोध पोलीस घेत असून, शहरातील सुप्रसिद्ध असलेला सुरेश अहिरे या वीज कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर एक प्रामाणिक कर्मचारी हरपल्याची खंत व्यक्त होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *