द्वितीय शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच द्वितीय वर्ष वसतिगृह शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात मज्जाव ; एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट फार्मसी महाविद्यालयातील प्रकार

590

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : एस एम बी टी सेवभावी ट्रस्ट फार्मसी महाविद्यालय इगतपुरी येथील वसतिगृहात रहाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वीच द्वितीय वर्षाची वसती गृह फी न भरल्याने वसतिगृहात प्रवेश नाकारला जात असून, यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीला जावे लागत असल्याने या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी मनसेचे ठाणे पालघर जिल्हा परिवहन सचिव दिनेश बेलेकर यांनी महाविद्यालय प्रशासनाला केली आहे. या महाविद्यालयात शिकणारी चेतना कृष्णा बेलेकरं हिने 16  फेब्रुवारी 2021 ला 12 महिन्यांचे वस्तीगृह शुल्क 77 हजार आणि डिपाॅजीट 10 हजार असे ऐकून 87 हजार रुपये शुल्क भरले. 12  महिन्यांचं शुल्क भरून 7 महिने ही उलटले नाही आणि वस्तीगृह प्रशासन पुन्हा दुसऱ्या शैक्षणिक  वर्षासाठी शुल्क भरण्यासाठी तगादा लावत असून. ही अन्यायकारक शुल्क न भरल्यास  विद्यार्थ्यांना वस्तीगृहात प्रवेश नाकारला जातो. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले जाते आहे. असे अनेक विद्यार्थी यामुळे अडचणीत  सापडले असून, याबाबत विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका दिनेश  बेलेकर यांनी मांडली आहे. त्यांनी याबाबत बोलताना सांगितले की काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात हे या महाविद्यालयाचे ट्रस्टी असून ते सध्या कॅबिनेट मंत्री असल्याने आपल्या पदाचा गैरवापर करत असून, विद्यार्थ्यांना वेठीस धरत आहे. मात्र याबाबत महाविद्यालय प्रशासनाने आम्ही विद्यापीठाच्या सुचने प्रमाणे  विद्यार्थ्यांना वारंवार सूचना दिल्या जातात मात्र वसतिगृह शुल्कहा महाविद्यालयाचा भाग नसून तो ट्रस्ट चा  भाग असल्याचे सांगत दिनेश बेलेकर यांनी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी महाविद्यालय प्रशासनाकडे केली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *