ग्रामपंचायत कारभाऱ्यांच्या पुढाकाराने भीमानदीचे पात्र स्वच्छ ; 2 हजार मूर्तींचे विसर्जन

398
कोरेगाव भीमा,ता.शिरूर (-प्रतिनिधी, गजानन गव्हाणे) : अनंत चतुर्थीला भीमा नदी तीरावर व नदीच्या पाण्यात पडलेले निर्माल्य काढण्यासाठी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतच्या महिला सदस्यांनी कंबर कसत नदी पात्रातील निर्माल्य पाण्यातून बाहेर काढत नदी स्वच्छ केली. तसेच पुढील वर्षांपासून नदी लगत निर्माल्य ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल असे उपसरपंच शिल्पा गणेश फडतरे यांनी यावेळी सांगितले.
कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथील भीमा नदीच्या पात्रात गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात घरघुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येते. कोरेगाव भीमा, सणसवाडी, पेरणे फाटा, लोणीकंद आदी भागातून गणेशमूर्ती भीमा नदी पात्रात विसर्जित करण्यात येतात. या ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आला नसल्याने अनेक गणेशभक्तांनी निर्माल्य नदीपात्रात तसेच नदीच्या परिसरात टाकून दिले. यामध्ये हार, फळे, प्रसाद, केळी ची खुटे आदी निर्माल्य होते. अखेर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी कोरेगाव भीमा स्मार्ट व स्वच्छ करण्याच्या हेतूने नदी पात्र स्वच्छ करत नागरिकांनी यापुढे आपली नदी स्वच्छ ठेवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

कोरोनाच्या काळात मिरवणुकीवर बंदी असल्याने सार्वजनिक गणेश मंडळ तसेच घरघुती अश्या 2 हजार पेक्षा लहान मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन नदी मध्ये करण्यात आले. ग्रामपंचायतच्या वतीने नदी पात्रात गणेश भक्तांना कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी लाईट ची व्यवस्था करण्यात आली होती. नदी पात्र स्वच्छ करत उघड्यावर पडलेल्या गणेशमूर्ती पुन्हा नदी च्या प्रवाहात सोडण्यासाठी ग्रामपंचायत सदस्या मनीषा गव्हाणे, शैला फडतरे, अर्चना सुपेकर, सविता घावटे, ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले, संपत गव्हाणे, शीतल गायकवाड, हर्षदा सुपेकर, संगीता भोकरे, पूनम पाटील, प्रिया सुपेकर, श्रुती गव्हाणे, विशाल गव्हाणे, निखिल सुपेकर, स्वप्नील भोकरे, तिरसिंग  नानगुडे  बाबू भोकरे आदींनी काम केले. विसर्जनाच्या दिवशी नदी पात्रात गर्दी टाळण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, विकास मोरे, श्रीमंत होनमाणे, अमोल दांडगे, एस. पवार, भास्कर बुधवंत, गणेश भंडारे आदींनी मोलाची भूमिका पार पाडली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *