मुरबाड,ठाणे : मुरबाड नगरपंचायतीच्या मनमानी कारभारा विरोधात मुरबाड शहर शिवसेना पुन्हा आक्रमक, शिवसेनेचे उद्या नगरपंचायती विरोधात धरणे अंदोलन

563
            मुरबाड,ठाणे : मुरबाड शहरातील नगरपंचायतीच्या कारभारावर सर्वच नागरिक व राजकिय पक्ष नाराजी व्यक्त करत असुन नगरपंचायतीच्या मनमानी कारभारा विरोधी मुरबाड शहर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत उद्या शुक्रवार दि. 30 रोजी नगरपंचायती समोर नगरपंचायत विरोधी धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन शिवसेनेने दिलेअसल्याची माहती शहराध्यक्ष राम दुधाळे यांनी सा.समाजशीलशी  बोलताना दिली.
           मुरबाड नगरपंचायतीच्या  आत्तापर्यंतच्या  मनमानी कारभाराने नागरिक त्रस्त असुन स्वतः चा  फायदा पहाणारी यंत्रणा नगरपंचायत राबवत असुन शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख राम दुधाळे यांनी पुन्हा नगरपंचायत विरोधात आंदोलन पुकारल्याने नगरपंचायत अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील विविध प्रभागात शौचालय व कॉक्रीट  रस्ते यांच्या निविदा काढुन त्या निविदा जाणीव पुर्वक न उघडता रद्द केल्याने, माहीती अधिकारात माहितो देतो सांगुन शुल्क जमा करुन ही हेतुपुरस्कर माहिती दडवणे, 2017 साली शासनाच्या 4 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात लाखोचा गैरव्यवहार झाल्या बाबत ,मुरबाड तालुका विक्री केंद्रात बेेकायदेशीर अतिक्रमण करुन सुरु करण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षा केंद्रावर कारवाई न केल्याबाबत, शहरातील विविध कामे अंदाजपत्रका प्रमाणे न करणे, अवैध प्रकारे जामर लावुन वाहनचालका कडुन बेकायदेशीर जमा केलेली रक्कम परत करणे, नगरपंचायतीत काम करणाऱ्या हंगामी कर्मचाऱ्याना किमान वेतन देणे, त्याच प्रमाणे मुरबाड शहरातीस तोंडलीकर नगर मधिल एका बिल्डिंग मधिल वाहनतळाच्या जागेत अनधिकृत बांधलेल्या व्यवसायीक गाळ्यावर कारवाई न केल्याबाबत तसेच एन वेळेस येणाऱ्या विषयावर मुरबाड शहर शिवसेना धरणे अंदोलन करणार आहे.  या मुद्याना हात घातल्याने शहरात भाजप विरोधी शिवसेना असा डाव रंगणार असुन या धरणे आंदोलनाला मुख्याधिकारी नेहमी प्रमाणे गैरहजर रहातात कि नगराध्यक्षा  सामोरे जाणार हा  देखिल चर्चेचा विषय शहरात रंगला आहे.
          नगरपंचायत हि आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शना खाली चालवली जाते असे नगरसेवक व मुख्याधिकारी नेहमी सांगत असल्याने या आंदोलनाला वेगळ्या नजरेणे पाहिले जात आहे.
–  प्रतिनिधि,जयदीप अढाईगे(सा.समाजशील,मुरबाड)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *