पोपटराव उत्तम आरोग्य जपा,काळजी घ्या – शरदचंद्र पवारांकडून माजी आमदार गावडेंना दीपावली शुभेच्छा 

289
               टाकळी हाजी,शिरूर : (योगेश भाकरे,प्रतिनिधी) – पोपटराव उत्तम आरोग्य जपा,काळजी घ्या अशा शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांना दीपावली शुभेच्छा देताना दिल्यात. आज दिवाळी पाडव्या निमित्त बारामतीच्या गोविंद बाग येथे माजी आमदार गावडे हे शरदचंद्र पवार यांची भेट व दीपावली शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. वयांच्या ८१ वर्षातही राजकारण,समाज कारणात सक्रीय असणाऱ्या या दोन महान व्यक्तिमत्वांची भेट बारामतीत झाली.माजी आमदार गावडे यांनी पवार साहेब व कुटुंबियांना दीपावलीच्या शुभेच्छा देताच पवार साहेबांनी देखील माजी आमदार पोपटराव गावडे यांना शुभेच्छा देताना पोपटराव तुम्ही उत्तम आरोग्य जपा,काळजी घ्या असे म्हणत शुभेच्छा दिल्या.
              या ही वयात राजकारणा बरोबरच दूरदृष्टी ठेवत समाजकारण करणाऱ्या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीमुळे शिरूरच्या पश्चिम भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करीत या दोन जेष्ठ नेत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी खासदार सुप्रिया ताई सुळे ,आमदार रोहित पवार उपस्थित होते.तर घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रंगनाथ थोरात ,संचालक राजेंद्र पोपटराव गावडे व मान्यवर उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *