वडगाव शेरी परिसरातील गरीबांची दिवाळी तेजोमय करण्याचा प्रयत्न – अमृत पठारे बहू उद्देशीय संस्थेचा उपक्रम 

265
            वडगाव शेरी,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – दोन वर्षांच्या कोरोनाच्या संकटानंतर सरकारने विविध प्रतिबंध हटविल्यानंतर सर्वसामान्यांचे जनजीवन पूर्व पदावर येत असले तरी मागील दोन वर्षांत अनेकांना असंख्य संकटांचा,आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यातच गोरगरीबांना तर अनेक हाल अपेष्टांना सामोरे जावे लागले. सध्या सर्वत्र दीपावलीचा सण सुरु असून गोरगरीबांना ही दिवाळीचा आनंद घेता यावा व त्यांची ही दिवाळी तेजोमय,गोड व्हावी या हेतूने  शिवसेना पुणे शहर महिला आघाडीच्या वतीने शिवसेना वडगाव शेरी विधानसभा समन्वयक,शिव अंगणवाडी जिल्हा संघटिका पुणे जिल्हा,अमृत बहू उद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अमृतताई पठारे यांनी वडगाव शेरी परिसरातील अनेक गोरगरीबांना दिवाळी फराळ ,भेट वस्तू ,गोरगरिबांना,वंचित, पीडितांना नवीन कपडे व आर्थिक मदतीचा हात देत त्यांना ही या दीपावली सणाचा आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
            शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर,उपनेत्या मीना कांबळी, संपर्क संघटिका तृष्णा विश्वासराव यांच्या मार्गदर्शनाने अमृत पठारे यांनी यावर्षीच्या दिवाळीस हा विधायक व स्त्युत्य उपक्रम राबवित वंचित ,पीडित ,गोरगरीबांचीची दिवाळी गोड करत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद फुलविण्याचा प्रयत्न करीत त्यांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे.
अमृत पठारें या परिसरातील सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक,विधायक कामांत सतत अग्रेसर राहत असून त्या सामाजिक कार्यात नेहमीच खारीचा वाटा उचलत असल्याने परिसरातील अनेक गरजू,गोरगरीबांना वेळोवेळी त्यांनी मदतीचा हात देत माणुसकीचे दर्शन घडविले आहे. चिपळूण पूरग्रस्तांना तर स्वखर्चाने त्यांनी २ टेंम्पो भरून जीवनावश्यक साहित्य,कपडे तेथील पूरग्रस्तांना थेट त्यांच्या गावात जाऊन देण्याचे कार्य देखील केले आहे. तर दीपावली निमित्ताने अमृत पठारे राबविलेल्या या विधायक उपक्रमामुळे परिसरातील अनेक गोरगरिबांच्या दिवाळीत आनंदाची नक्कीच भर पडली असणार आहे. माणुसकी या नात्याने माणसांनी माणसाशी नाते कसे घट्ट करत माणुसकी जपली जाते याचा मोठाच प्रत्यय अमृत पठारे यांच्या कार्यातून,उपक्रमातून वेळोवेळी परिसरातील गोरगरीबांना अनुभवण्यास मिळत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *