ज्ञानगंगा कॉलेजमध्ये NDA मधील करिअर व संधी मार्गदर्शन व्याख्यान संपन्न

340

मेजर निखिल निकम (IMA. डेहराडून), लाईफटाइम आर्डीनरी कॅप्टन विठ्ठल वराळ यांचे विशेष मार्गदर्शन 

शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : गंगा एज्युकेशन सोसायटी संचलित ज्ञानगंगा विश्वविद्यालय जुनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि कॉमर्स बाबुराव नगर, शिरूर मधील करियर काउन्सलिंग सेल व स्पोर्टस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने इ ११ वी व इ.१२ वी च्या विद्यार्थ्यांकरिता NDA व मिलिटरी मधील विविध अधिकारी पदं व त्यातील करियर आणि संधी यावर मार्गदर्शन व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. यावेळी मेजर निखिल निकम (IMA. डेहराडून), लाईफटाइम आर्डीनरी कॅप्टन विठ्ठल वराळ यांनी NDA ची तयारी तसेच मिलिटरीमधील करीयरच्या विविध संधी यावर बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. संरक्षण क्षेत्रात असलेल्या अधिकारी पदांच्या असंख्य संधीचे उत्तमरीतीने विवेचन केले. तसेच तरुणांना संरक्षण क्षेत्राबद्दल असलेले आकर्षण, महिलांना निर्माण झालेली संधी यावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कष्ट,सातत्य वेळेचे नियोजन,ध्येयाची निवड, जिद्द या चिकाटी जर विद्यार्थ्यांनी आत्मसात केली तर अशक्य काहीच नसते असे विचार मेजर निकम यांनी मांडले. लाईफटाइम आर्डीनरी कॅप्टन विठ्ठल वराळ यांनी छोट्याशा खेड्यातुन येऊन राष्ट्रपती भवनापर्यंतचा जीवनप्रवास कसा केला, हे सांगितले. सैन्य भरती विषयी विशेष आकर्षणाचा फायदा घेवून विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी स्वतःला समर्पित करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना मेजर निखिल निकम यांनी अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली. सदर व्याख्यानाचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेराम घावटे यांनी केले. तर गंगा एज्युकेशन सोसायटीज मार्फत राबवत असलेल्या विविध कार्यशाळा, विद्यार्थी केंद्रीत उपक्रम, तसेच येत्या काळात बदलत असलेली शिक्षण पदधती यावर संस्थेचे सी.ई.ओ. डॉ नितिन घावटे यांनी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सौरभ शिंदे यांनी केले तर यासाठी विशेष मेहनत प्राचार्य संतोष येवले, क्रीडाशिक्षक ओंकार शेळके व सर्व विभागांचे प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी घेतली. प्रा.गौरी वैदय यांनी प्रास्ताविक तर प्रा.किशोर जगताप यांनी सर्वांचे आभार मानले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *