शिवसेना शहरप्रमुखाने भरला भाजपच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज ; मुरबाड नगरपंचायत निवडणुक

268
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळी आज शेवटच्या दिवसापर्यंत 126 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून मुरबाड शिवसेना शहप्रमुख राम दुधाले यांनी अकस्मात भाजपच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय खळबळ माजली आहे. मागिल निवडणुकीत तत्कालीन शिवसेना शहप्रमुख संतोष जाधव यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे निवडक उमेदवारी मागितल्या होत्या. मात्र तिढा न सुटल्याने शिवसेनेतील इच्छूक उमेदवार हे भाजपतून लढले त्यामुळे शिवसेनेच्या अंतर्गत वादाचा फायदा भाजपला होऊन मुरबाड नगरपंचायत वर एक हाती सत्ता आली होती. आताही शिवसेना व भाजपमध्ये नाराज कार्यकर्त्यांची संख्या वाढली असल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याचे पहायला मिळाले. तर भाजप शिवसेना पक्षानी प्रभागाबाहेरील उमेदवारी काही प्रभागावर लादल्याने अनेक प्रभागात स्थानिक उमेदवार अपक्ष लढण्याचा निर्धार करत असल्याने राजकीय पक्षांची अडचण वाढली आहे त्यामळे 13 तारखेला उमेदवारी अर्ज माघारी घेताना किती उमेदवार माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणूकीत ओबीसी आरक्षण आसलेल्या प्रभागात काय होते याकडे हि सर्वांचे लक्ष लागले असून, ओबीसीच्या आरक्षणाविरोधात निकाल लागल्याने हि निवडणुक प्रक्रियाच रद्द होते काय ? याबाबत ही चर्चा सुरू झाली आहे. तर मुरबाड नगरपंचायत निवडणुकीच्या रिंगणात किशोर गायकवाड या पत्रकाराने अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने सर्व पत्रकारांनी त्यांना पाठींबा दिला आहे.
ओबीसी आरक्षण असलेल्या प्रभागातून इच्छुक असलेल्या चार प्रभागातील उमेदवारांचे 22 अर्ज स्वीकारण्यात आले. परंतु ते रदद झाले. मुरबाड नगर पंचायतीचे निवडणुकीत प्रशांत चंद्रकांत तेलवणे या मूकबधिर व्यक्तीने प्रभाग क्रमांक 13 मधून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सर्वात जास्त अर्ज प्रभाग क्रमांक 14 मधून उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *