अलिबाग, रायगड : मुंबईच्या ५५ अपंग आणि ५ अंध दिव्यांगांची रायगड भ्रमंती सहल मोठ्या उत्साहात, सहलीचा मनमुराद आनंद लुटत दिव्यांगांनी चक्क पायवाटेने जात किल्ला केला सर

511
          अलिबाग, रायगड : मुंबईच्या ५५ अपंग आणि ५ अंध दिव्यांगांनी रायगड भ्रमंती सहल मोठ्या उत्साहात पार उत्साहात पाडली आहे. रायगड सहलीचा मनमुराद आनंद लुटत या दिव्यांगांनी चक्क पायवाटेने जात   किल्ला सर केला आहे. दिव्यांगांनी जिद्दीने साकारलेला रायगड भ्रमंती हा उपक्रम तरुणांसाठी हा एक नक्कीच स्फुर्तीदाई आहे.
        रायगड किल्ला म्हटल कि, प्रत्येकाच्या अंगात नवचैतन्य निर्माण होते. पण हा किल्ला पयरीच्या मार्गाने चढुन जाण्याचा विषय काढला कि, अनेकांचे आवसान गाळून जाते. हात, पाय, डोळ्यांनी सुधृढ असणाऱ्यांची हि अवस्था होते. तर मग अंध आणि अपंग व्यक्तींचे काय ? असा प्रश्न अपल्यासमोर उभा राहील. पण मुंबईतील ५५ अपंग आणि ५ अंध व्यक्तींनी पायवाटेने रायगड किल्ला सर करून स्वतः सोबत इतरांचे मनोबल वाढविण्याचा भीष्म पराक्रम केला आहे.
           फिनिक्स फाऊंडेशन मुंबई आणि रोटरी क्लब जुहू यांनी दिव्यांगासाठी रायगड भ्रमंती या सहलीचे आयोजन केले होते. विनामुल्य सहभाग असणाऱ्या या सहलीचे स्वरुप ट्रेकिंगचे होते. तरी सुद्धा अंध आणि अपंग व्यक्तींनी उत्स्र्फूत पणे या सहलीत सहभाग घेतला. १ डिसेंबर रोजी संध्याकाळी त्यांनी नाणी दरवाजा, महादरवाजा, हत्ती तलाव या पायी मार्गाने गड सर केला. रायगडावर वस्ती केली. गड भ्रमंती केल्यानंतर २ डिसेंबर रोजी पुन्हा पायी मार्गाने ते गड उतरले.
           दिव्यांगाचे मनोबल वाढावे यासाठी आयोजित केलेल्या सहलीतुन अनेक सुधृढ व्यक्तींना अपंगत्त्वावर मात करून प्रयत्न पुर्वक किल्ला सर करणाऱ्या या दिव्यांगा कडुन मनोबल वाढीचे धडे घेतले पाहीजेत. तसेच यात सहभागी सर्व जिगरबाजांनी अपंग दिना निमित्ताने आपण फक्त शरिराने अपंग आहोत.  परंतु मनाने सद्रुढ व्यक्तीचे मनोबल वाढवु शकतो हेच दाखवुन दिले आहे.
– प्रतिनिधी,सारिका पाटील,(सा.समाजशील,अलिबाग)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *