मुरबाड,ठाणे : शहरातील स्थानिक व्यवसायीकांसाठी शिवसेनेचा पुढाकार, डि-मार्ट सारख्या मोठ्या व्यापारी व्यवसायीकाना मुरबाड शहरात व्यवसाय परवानगी न देण्याची नगरपंचायतीकडे केली मागणी

500
           मुरबाड,ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शहरातील स्थानिक व्यवसायीकांसाठी शिवसेनेना  सरसावली असून  डि-मार्ट सारख्या मोठ्या व्यापारी व्यावसायिकांना  मुरबाड शहरात व्यवसाय परवानगी न देण्याची मुरबाड शिवसेनेने नगरपंचायतीकडे मागणी केली आहे.
          मुरबाड शहराचा विकास होताना शहराच्या मध्य भागी असलेल्या शिवाजी चौका लगत असलेले तहसिलदार कार्यालय शहराबाहेर औद्योगिक क्षेत्रात स्थलांतरीत झाल्याने तालुक्यातील दुर्गम भागातुन तसेच विविध भागातुन येणाऱ्या वर्गाचा बाजारपेठेत संपर्क व्हायचा. मात्र गेल्या तीन ते चार वर्षा पासुन पंचायत सिमिती व तहसिल कार्यालय मुख्य बाजारपेठेतुन स्थलांतरीत झाल्याने मुरबाड शहरातील व्यापारी वर्गाची दुरावस्था झाली आहे. त्यात राष्ट्रीय महामार्ग वर लागणारा मासळी बाजार, शाकाहारी भाजीपाला विक्रीसाठी तयार असल्याने नियोजित मश्चिमार्केट ओस पडते त्यात परिसरात डि – मार्ट सारखे काही व्यवसाय नगरपंचायत हद्दीत येतअसल्याने त्यांनी व्यवसाय सुरु केल्यास स्थानिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येईल,स्थानिक व्यावसायिकांना वाचवण्यासाठी शिवसेना सरसावली असुन नगरपंचायत हद्दीत डि-मार्ट सारख्या व्यावसायिकांना  परवानगी न देेण्याची मागणी स्थानिक शिवसेनेने केल्याने मुरबाड मध्ये मोठे व्यवसायीक येतील का?  हा सवाल सर्व सामान्य जनतेतून केला जात आहे.
– प्रतिनिधी,जयदीप,अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *