मुरबाड,ठाणे : विकास कामाच्या शुभारंभ पाटीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे याचे नाव न टाकल्याने मुरबाड शिवसेनेत असंतोष, तर नाव न टाकणाऱ्या अभियंत्यावर कारवाईची मागणी

592
          मुरबाड,ठाणे : मुरबाड मधील विकास कामाच्या शुभारंभ पाटीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे याचे नाव न टाकल्याने मुरबाड शिवसेनेत असंतोष पसरला असून  पाटीवर शिंदे यांचे नाव न टाकणाऱ्या अभियंत्यावर कारवाईची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
       मुरबाड तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत धसई, कळंभाड, मढ, रामपुर रस्त्याचे विकास कामाचा शुभारंभ 12 नोव्हे. 18 रोजी भिवंडी लोकसभा खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले.  या वेळी या कामाच्या भुमिपुजन पाटीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे याचे नाव न टाकल्याने स्थानिक शिवसेनेत नाराजी व्यक्त होत आहे सदर नाव न टाकणाऱ्या अभियंत्यावर कारवाईची  युवा सेना उपतालुका प्रमुख निलेश चौधरी यांनी निवेदना द्वारे कार्यकारी अभियंता मुरबाड यांच्याकडे केली आहे.
    सत्तेत भाजप ,शिवसेना व आरपीआय एकत्र असताना विकास कामाच्या पाटीवर फक्त भाजपाच्याच नेत्याची नावे का ? असा आरोप  करत शिवसेनेला तालुक्यात खच्ची करण करण्याचे काम भाजप करत असल्याने याला मदत करणाऱ्या अभियंत्यावर कारवाईची शिवसेनेने मागणी केल्याने आगामी निवडणुकीत या दोघांच्या अस्तित्वाची आतापासूनच लढाई सुरु झाल्याचे दिसुन येत आहे.
– प्रतिनिधी,जयदीप,अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *