समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील जांबुत येथील उपकेंद्रातील आरोग्य सेवा सध्या रामभरोसे असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये ऐकिवात येत असून पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी उप आरोग्य केंद्रात अनेक सर्वसामान्य रुग्णांचे प्राथमिक उपचारांअभावी हाल होत आहेत तर अनेक रुग्णांना उपचाराविनाच परत जावे लागत आहे. या असुविधेमुळे अनेक रुग्णांचे हाल होत आहे.आरोग्य उपकेंद्रामध्ये आरोग्य सेवक उपलब्ध नसल्यामुळे चांगल्या प्रकारची सेवा रुग्णांना मिळत नाही.रुग्णांवर योग्य वेळी उपचार होत नाहीत. त्यामुळे ही रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी त व नागरीकांची उपचारासाठी इतरत्र जाण्याची होत असलेली धावपळ थांबवण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. इतरत्र जाऊन खासगी रुग्णालयात उपचारास्तव खर्च होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठाच आर्थिक फटका व नाहक मनस्ताप होत असल्यामुळे या गोष्टींकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी देखील ग्रामस्थांमधून होत आहे.जांबुत येथील या समस्येबाबत तालुका प्रभारी वैद्यकीय अधिकारी कट्टीमणी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
डॉ.सचिन देसाई – जिल्हा आरोग्य अधिकारी,पुणे
जिल्ह्यात अनेक ठिकाणी आरोग्य विभागातील पदे रिक्त असून एका आरोग्य सेवकास इतर चा ही अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे.जांबुत येथे ही काही पदे रिक्त असल्याची माहिती मिळाली असून शासनाकडून आरोग्य कर्मचारी,सेवक उपलब्ध झाल्यानंतर जांबुत उपकेंद्रासाठी प्राधान्याने ते थे नियुक्त देण्याचा प्रयत्न करू. उपकेंद्रात सामान्य उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आशा सेविकांच्या माध्यमातून सामान्य औषोधोपचार होत असतात.
– शुभम गायकवाड – सामाजिक कार्यकर्ते,जांबुत
जांबूत गावामध्ये उपआरोग्य केंद्र उपलब्ध असूनही नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत नाहीत त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. गेले सहा महिने येथे आरोग्य सेवक उपलब्ध नाही. तातडीने रिक्त पदे भरण्यात येऊन नागरिकांची होणारी गैरसोय तात्काळ थांबवण्यात यावी.अन्यथा याविषयी आमरण उपोषण करण्यात येईल.
– सुभाष सोनवणे – ग्रामस्थ,जांबुत
जांबूत उपकेंद्रात पंचक्रोशीतील सर्वसामान्य रुग्ण औषधोपचार घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे प्राथमिक उपकेंद्र आरोग्य सेवा कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी जांबूत ग्रामपंचायतीने याबाबत ठोस पावले उचलण्याची गरज आहे.