जातेगाव महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना शिबीर संपन्न

226

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत कॉलेज ऑफ बी.बी.ए., बी.सी.ए., बी.सी.एस.अँड बी.कॉम जातेगाव या महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना शिबीर संपन्न झाले. या शिबिरात विद्यार्थ्यांनी ग्रामस्वचछता, पटनाट्यातून समाज प्रबोधन ,व्यसनमुक्ती जनजागृती, झाडे लावा झाडे जगवा, स्त्रीभ्रूणहत्या, वृक्षारोपण अभियान, असे अनेक कौतुकास्पद काम केले. राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना नवचेतना देण्याचे कार्य करते.  प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविणे त्याच बरोबर सामाजिक बांधीलिकीची जाण व सेवा भाव निर्माण करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करत असते. या शिबिराच्या माध्यमातून तरुणांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, सामाजिक बांधिलकी यासाठी या शिबिराचे आयोजन केले जाते असे मत संस्थेचे अध्यक्ष सुंगधराव उमाप यांनी व्यक्त केले. यावेळी प्राचार्य ललितकुमार इंगवले, हिवरे गावच्या सरपंच शारदा गायकवाड, माजी सरपंच अमोल जगताप, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ शिर्के, समन्वयक गजानन पाठक अन्य उपस्थिती होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे जयराम पवार जेष्ट पञकार ज्ञानेश्वर मिडगुले यांची व्याख्याने झाली. तसेच पुजा काटेरोहिणी झरड,  सिमा बांगर, प्रीती पवार उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा.विजय गायकवाड यांनी केले तर आभार श्रध्दा पवळे यांनी मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *