८ मार्चला महिलादिनी रंगणार कवठे येमाईत होम मिनिस्टरचा कार्यक्रम 

240
       शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – दि. ८ मार्चला  जागतिक महिलादिनाचे औचित्य साधत शिरूर पंचायत समितीच्या माजी सदस्या डॉ.कल्पनाताई पोकळे यांनी शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे खास महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
       येथील माहेश्वरी लॉन्स,मंगलकार्यालयात हा कार्यक्रम मंगळवार दि. ८ ला सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत होणार असून क्रांती माळेगावकर प्रस्तुत या कार्यक्रमातील प्रत्येक विजेत्या स्पर्धकास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. तसेच यावेळी गावातील तरुण लेखक मोहन पडवळ लिखित गुल्हर या मराठी चित्रपटाची ५० तिकिटे मोफत देण्यात येणार आहेत.या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ऍक्वागार्ड,व्दितीय क्रमांकास एल इ डी टीव्ही,तृतीय क्रमांकास  मायक्रो ओव्हन,चतुर्थ क्रमांकास मिक्सर तर पाचव्या क्रमांकास एक टेबल फॅन बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत.
      तसेच या कार्यक्रमा दरम्यान कोविड (कोरोना) काळात काम केलेल्या सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस,आरोग्यपरिचारिका,आदर्श मातांचा सन्मान सोहळा ही होणार असल्याची माहिती ही डॉ.कल्पना पोकळे यांनी सा.समाजशीलशी बोलताना दिली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *