शिक्रापूर येथे महाशिवराञी निमित्त हजारो भाविकांनी घेतले शिवलिंगचे दर्शन

230

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : ‘हर हर महादेव’ , ‘जय भोलेशंकर’ च्या गजरात शिक्रापूर येथे रांगेत उभे राहुन हजारो भाविकानी शिवलिंगाचे दर्शन घेतले. तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर मंदिरात भाविकांना आज प्रत्यक्ष महादेवांच्या दर्शनाचा भाविकांना आनंद मिळाला. या वर्षी शासनाने काही  प्रमाणात निर्बंध स्थिथिल केले. पहाटे मंदिरातील पूजा करण्यात आली त्यानंतर दर्शनाला सुरवात झाली. यावेळी मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. लॉकडाऊनमध्ये उत्सवांवर अवलंबून असलेल्या दुकानदारांचे, व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु या वर्षी त्यांच्या चेहऱ्यावर नवे चैतन्य पाहायला मिळाले. मंदिराचे पुजारी बाळासाहेब शेंडे, संतोष शेंडे व शिक्रापूर ग्रामस्थांच्या वतीने भाविकांच्या दर्शनाची उतम सोय करण्यात आली त्याच बरोबर उपवासाचा अल्पोहर देण्यात आला.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *