यशकिर्ती समाजिक संस्थेच्या वतीने आशिर्वाद ट्रस्ट मध्ये संस्थेच्या वतीने खाऊ वाटप

235

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर येथील यशकिर्ती समाजिक संस्थेच्या वतीने कासारी फाटा येथील आशिर्वाद ट्रस्टच्या  आश्रमाशाळेत मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.  यशकिर्तीच्या सदस्या संगिता तावरे व तूषार रणसिंग यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन छोट्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १६ अनाथ मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यानी केले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा मंगल सासवडे, सुषामा गायकवाड, सचिव वैशाली खेडकर, खजिनदार भाग्यश्री जाधव, रिना सोनवणे, रमा आठवले, रोहन तावरे, नवनाथ जाधव, साविञी शिंदे उपस्थित होते. यावेळी संगिता तावरे व तुषार रणसिंग यांना ट्स्टच्या वतीने प्रमाणपञ देऊन गौरविण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा सासवडे यांनी सांगितले की, “ट्रस्टच्या वतीने या मुलांचे संगोपन होत आहे ही आभिमानाची बाब असुन यापुढे ट्स्टला सर्वातोपरी मदत करण्यात येईल.” यावेळी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली. खाऊवाटप करताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडुन वाहत होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व  आभार पञकार राजाराम गायकवाड यांनी मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *