शिक्रापूर सोसायटीवर भैरवनाथ सहकार कृषी पॅनेलचे वर्चस्व

574

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिरुर तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शिक्रापूर सोसायटीवर भैरवनाथ कृषी सहकार पँनेलने १३ पैकी १३ जागा मिळवुन समोरच्या भैरवनाथ परिवर्तन पॅनेलला धुळ चारली आहे. शिक्रापूरच्या इतिहासात प्रथमच  चुरशीची निवडणूक पाहावयास मिळाली.  पॅनेलच्या उमेदवारांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे पँनेलला घवघवीत यश मिळाले. यापुढे गावच्या विकासासाठी असेच एकञित रहा असे आवाहान माजी सरपंच शिरिष जकाते यांनी छोट्याशा विजयी सभेत बोलताना सांगितले. भैरवनाथ पँनेलचे माजी सरपंच हेमंत करजे, पश्चिम महाराष्ट्र महात्मा फुले समता परिषद संघटक सोमनाथ भुजबळ,अरुण कंरजे, हनुमंत सासवडे व दुसऱ्या पँनेलचे रेखा बांदल, सरपंच रमेश गडदे,  माजी सरपंच रामभाऊ सासवडे, अरुण सोंडे, बाळासाहेब चव्हाण, राजाभाऊ मांढरे यांनी स्वतंत्र पँनेल तयार केले. यामध्ये भैरवनाथ कृषी पँनेलला यश मिळाले व परिवर्तन पँनेलचा पराभव झाला. शिक्रापूर सोसायटीच्या मतमोजणीच्या वेळेस प्रचंड गर्दी झाली व परिसराला जञेचे स्वरुप आले. विजयी उमेदवार मध्ये  गौरव कंरजे, जालिंदर केवटे, संदिप गायकवाड, शिवाजी जकाते, सुनिल भुमकर, दताञय मांढरे, आनिल राऊत, दताञय राऊत तर महिलामध्ये चंद्रकला भुजबळ विमल वाबळे, निलेश थोरात, विठ्ठल सोंडे, मारुती राऊत हे  भैरवनाथ कृषी पँनेलचे उमेदवार निवडुन आले. निकालानंतर भैरवनाथ मंदिरात छोटिसी विजयी सभा घेण्यात आली. विजयी सभेला उपसरपंच रमेश थोरात, ग्रामपंचायत सदस्या पुजा भुजबळ, सारिका सासवडे, शुभाष खैरे, मयुर कंरजे, प्रताप वाघोले, काका चव्हाण, मिना सोंडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. विजयी सभेचे सुञसंचालन ग्रामपंचायत सदस्य मयुर कंरजे यांनी केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *